Scholarship : नूतन शिक्षण संस्थेच्या ३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; प्रज्ञाशोध परीक्षेतही घवघवीत यश
सेलू : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसह नौरसजी वाडिया महाविद्यालय,पुणे यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या घटक संस्थांतील एकूण ३५ शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालयाचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. इयत्ता पाचवीच्या तन्मय जयकिशन भुतडा याने राज्य गुणवत्ता यादीत १७ वे स्थान मिळविले आहे.
अन्य शिष्यवृत्तीधारकांमध्ये इयत्ता पाचवीच्या सानवी शितळे, विठ्ठल बोरसे, इयत्ता आठवीतील सक्षम आर्दड, आर्या घांडगे, शार्दूल जोशी, प्रणव घोडके, दर्शना जोशी, प्राची शिंदे, श्रेया द्यावरवार यांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता आठवीतील आर्या घाडगे राज्यात पंधराशे स्थान, तर सोहम आर्दड, सक्षम आर्दड, दर्शना जोशी, इयत्ता नववीतील श्लोक कुलकर्णी राज्यात २३ वा, तर पियुष मुनेश्वर, स्वराज जाधव, रितेश लहाने, सिद्धांत नागरे, हनुमान खेडकर, तन्मय कुलकर्णी, अर्जुन कदम, विवेक गव्हाणे, इयत्ता दहावीतील प्रतीक ठाकर, दिग्विजय तौर, सय्यद मुदसरअली शिष्यवृत्तीधारक आहेत
बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या इयत्ता पाचवीतील श्रुती राऊत, देवांशी टेळकीकर आणि आठवीतील वसुधा गजमल, धनश्री घाडगे शिष्यवृत्तीधारक आहेत. श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील इयत्ता आठवीच्या मैथिली गावंडे, संस्कृती सावजी, नंदिनी मालशेटवार, तर महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत स्नेहा मुनेश्वर, श्रेया राऊत, अक्षरा गलबे शिष्यवृत्तीधारक आहेत. विभाग प्रमुख सुनील तोडकर, विरेश कडगे, बन्सीधर पद्मावत, आरती कदम, वर्षा कदम, गजानन मुळी, अरविंद अंबेकर, बाळू बुधवंत, कीर्ती राऊत, वैशाली चव्हाण, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजपूरकर, सुनील मोगल, उपेंद्र दिवाळकर, कैलास मलवडे, सुधीर जोशी, एस.एस.पांडे,
भोगावकर, सोळंके, देवधर, जाधव, गोरे, बोरगीळ आदींचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, डी.के.देशपांडे, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, संतोष पाटील, निशा पाटील, नरेंद्र पाटील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.