Science Exhibition : ‘नूतन’च्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम
सेलू (जि.परभणी) : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त नूतन विद्यालय परिसरात बुधवारी आयोजित विज्ञान उपकरण प्रदर्शनाला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनात नूतन महाविद्यालयाच्या गजानन आकात (बी.एस्सी. द्वितीय वर्ष) या विद्यार्थ्यांने ‘सेलू तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे फवारणी वरील खर्चाचे व्यवस्थापन समस्या व उपाय’, तर रवि हातकडके (बीए प्रथम वर्ष) याने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग शेतीसाठी पावसाच्या पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन’ हा प्रयोग सादर केला. डॉ.अमित कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या सोहम गुंडेकर आणि अर्थव भारती ( इयत्ता आठवी) यांनी ‘चांद्रयान-३ लॅंडिग’, तर इयत्ता दहावीच्या धनश्री हिंगे, दुर्गा देवधर यांनी ‘ग्रीन ग्रीन हायड्रोजन प्रोडक्शन’ हा प्रयोग सादर केला. स्वप्निता ढवळे यांनी मार्गदर्शन केले. सौ सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेतील पृथ्वीराज इंगळे या चौथीच्या विद्यार्थ्यांने ‘घराच्या सुरिक्षततेसाठी अलार्म’ हा प्रयोग अमोल हळणे व सोनाली कुबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. नूतन विद्यालयातील श्रीनिवास देवकर आणि श्रेया कासट यांनी ‘कोल थर्मल पॉवर प्लांट’ आणि गोपाळ कुलकर्णी याने ‘वर्किंग मॉडेल ऑफ किडनी’ हा प्रयोग सादर केला. अदिती अंबेकर व अश्विनी पटाईत यांनी मार्गदर्शन केले. श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या प्रतीक्षा चिंचोलकर, साक्षी फंड यांनी ‘ग्रहण आणि ग्रहणाचे प्रकार’ हा प्रयोग कीर्ती राऊत, वैशाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तर ‘चांद्रयान-३ प्रक्षेपण’ हा प्रयोग साक्षी गोसावी, दिव्या घोडके आणि गौरी गायकवाड या विद्यार्थिनींनी पंडित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे दिल्ली आयआयटीतील प्राध्यापक डॉ.संजीव देशमुख, संस्थाध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, मकरंद दिग्रसकर, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, राजेश गुप्ता आदींसह मान्यवरांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले. प्रदर्शनासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.