आनंददायी शनिवार : विविध उपक्रमांध्ये रमले विद्यार्थी; नूतन विद्यालयात कार्यक्रम
सेलू : सेलू येथील नूतन विद्यालयात आयोजित आनंददायी शनिवार उपक्रमात इयत्ता पाचवी ते सातवीतील ९५० विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला. याप्रसंगी विद्यार्थीचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी कबड्डीच्या राष्ट्रीय व खेलो इंडियातील खेळाडूंचा सत्कार घेण्यात आला. प्रभारी मुख्याध्यापक डी.डी.सोन्नेकर, जेष्ठ शिक्षक पी.टी.कपाटे, बाबासाहेब हेलसकर, सुनीता सांगुळे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रशांत नाईक यांनी केले. यानंतर खेलो इंडिया व राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंच्या मुलाखती घेऊन शालेय विद्यार्थ्यांना प्रेरित करुन प्रोत्साहन देण्यात आले. आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. क्रीडा शिक्षक संजय भुमकर यांनी बैठे व खडे कवायत घेतली. क्रीडा शिक्षक गणेश माळवे यांनी मार्गदर्शन केले. सहशिक्षक विरेश कडगे यांनी प्राणायाम, ध्यान धारणावर माहिती सांगून प्रात्यक्षिके करून घेतली. याप्रसंगी सहकार्य आरतीनकदम, सूर्यकला सुर्यवंशी, श्रीमती दायमा, फुलचंद गावात, अशोक लिंबेकर,बन्सीधर पदमावत, नंदकिशोर चव्हाण, गोपाळ आम्ले यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.