शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का तेलभरे राज्यात दुसरी; प्रिन्स सीबीएसई स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का तेलभरे राज्यात दुसरी; प्रिन्स सीबीएसई स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

सेलू : एलकेआरआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलमध्ये शनिवारी, सहा जुलैरोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का तेलभरे या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीमध्ये (CBSE/ ICSC board ) दुसरा क्रमांक मिळवला आहे. यासाठी श्रीराम प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी तनिष्का तेलभरे आणि तिच्या पालकांचा सत्कार केला. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी “सुविधा देणारा” बनले पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन केले. सायन्स ऑलिम्पियाड ( IMO, NSO, IEO, IGKO, NCO, ISSO) मध्ये इंटरनॅशनल रँक मिळवलेल्या प्रेरणा काष्टे, प्रज्वल रोडगे ( INR- 8), तेजश्री चौधरी ( INR- 9) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

One thought on “शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का तेलभरे राज्यात दुसरी; प्रिन्स सीबीएसई स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!