सेलू बंदला संमिश्र प्रतिसाद; ॲड.ढोले यांचे उपोषण सुरूच
सेलू : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसलेल्या ॲड.विष्णू ढोले यांना पाठींबा दर्शविण्यासाठी समाज बांधवांच्यावतीने बुधवारी, १० जुलै रोजी सेलू ‘बंद’ ची हाक देण्यात आली होती. शहरातील अस्थापने बंद ठेवून उपोषणास व्यापारी बांधवांनी पाठींबा दिला असल्याने सेलू बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मागील सात दिवसापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सामाजिक कार्यकर्ते ॲड.विष्णू ढोले हे आमरण उपोषण करत असून त्यांच्या उपोषणास सामाजिक संघटना, राजकीय पक्ष संघटना आदी पाठींबा देत आहेत. मात्र प्रशासनाच्यावतीने सदरिल उपोषणाची गांभीर्याने दखल घेतली जात नसून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आसल्याने सदरिल बंद पुकारून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आला होता.