विधानपरिषद : राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर विजयी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द खरा ठरविला

विधानपरिषद : राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर विजयी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द खरा ठरविला

विधानपरिषद : राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर विजयी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द खरा ठरविला

परभणी, दि.१२ : परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर विधानपरिषद निवडणुकीत पहिल्या पसंती क्रमांकाची २३ मते मिळवून विजयी झाले आहेत. विटेकर यांच्या विजयाने लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द खरा ठरविला आहे. विटेकर यांच्या विजयाचा परभणीसह सोनपेठ व जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांकरीता शुक्रवारी सायंकाळी मतदान झाले. त्या पाठोपाठ मतमोजणीची प्रक्रियाही सुरु झाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटींग होईल, अशी भिती व्यक्त होत होती. परंतु, महायुतीअंतर्गत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी एकजुटीने मतदान करीत ११ पैकी १० जागांवरील महायुतीचे उमेदवार पहिल्या पसंतीच्या कोट्यातून निवडून आणले. त्यात भारतीय जनता पार्टीचे पाच, राष्ट्रवादी काँगे्रसचे दोन व शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी या निवडणुकीत परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विटेकर यांना उमेदवारी बहाल केली अन् पहिल्या पसंती क्रमांकाची २३ मते देवून विटेकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, विटेकर हे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे माघारी फिरले होते. त्याआधीच्या म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विटेकर यांचा अवघ्या ४० हजार मतांनी पराभव झाला होता. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी विटेकर यांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देवू, असे परभणीतील सभेतून जाहीर केले होते. त्याप्रमाणे विटेकर यांना विधानपरिषद निवडणूकीत निवडून आणून पवार यांनी दिलेला शब्द खरा ठरविला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!