दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी माधव गव्हाणे यांची निवड
सकाश प्रतिनिधी, सेलू : सांस्कृतिक स्त्रोत आणि प्रशिक्षण केंद्र दिल्लीच्या वतीने आयोजित १० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे यांची निवड झाली आहे.
भारतातील विविध राज्यातील शिक्षकांचे कार्य कौशल्य वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केली जातात. “शिक्षणात हस्तकला कौशल्याचा समावेश आणि उपयोग” या संदर्भात हे प्रशिक्षण देण्यात येते. गव्हाणे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.