शाळकरी मुलाला फूस लावून पळविले; सेलूत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा

शाळकरी मुलाला फूस लावून पळविले; सेलूत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा 

शाळकरी मुलाला फूस लावून पळविले; सेलूत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा

सेलू जि.परभणी : इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अचित विक्रम गिनगीने (वय १४ वर्ष ६ महिने रा.म्हाडा कॉलनी, सेलू) या शाळकरी मुलाला फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी, १४ जुलै रोजी रात्री साडेसात वाजता घडली आहे. याप्रकरणी वडील विक्रम गिनगीने यांच्या फिर्यादीवरून सोमवारी सेलू पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचित याच्या अंगात पिवळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, निळ्या रंगाची फुल पॅन्ट, पायात चप्पल व मानेवर काळा चट्टा आहे. अशा वर्णनाचा मुलगा आढळून आला, तर कळवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे. उपनिरीक्षक जयश्री पुरी तपास करीत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!