आश्वासनानंतर ॲड.ढोले यांचे उपोषण मागे
मुस्लिम आरक्षणासाठी दहा दिवस केले उपोषण
सेलू जि.परभणी : मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह मुस्लिम समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते ॲड.विष्णू ढोले यांनी सेलू शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात चार जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले होते. तहसीलदार दिनेश झांपले यांच्या आश्वासनानंतर दहाव्या दिवशी शनिवारी, १३ जुलै रोजी उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी पोलीस निरिक्षक दिपक बोरसे, उद्योजक सय्यद कादर, शेख रहीम, रहीम पठाण, आयुब अमिनोद्दीन, शेख महमुद, सुबोध काकडे, मोहंमद इलियास,अमोल डंबाळे, शेख साजिद, डॉ. मुताहेर पठाण, सुनील गायकवाड, अमजद बागवान, बापू धापसे आदींची उपस्थिती होती.