आषाढी एकादशी : सेलूतील उत्कर्ष विद्यालयात रंगली वेशभूषा स्पर्धा
श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित उत्कर्ष विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी,१६ जुलै रोजी वेशभूषा स्पर्धा वेशभूषा स्पर्धा रंगली. बालगोपाळांच्या वेशभुषांनी उपस्थितींची मने जिंकली.
अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजयजी रोडगे होते. मुख्याध्यापक कैलास ताठे, जिज्ञासा बालविहारच्या श्रीमती शिंदे तसेच शिक्षक उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संत नामदेव,संत एकनाथ, संत तुकाराम, संत मीराबाई, संत मुक्ताबाई आदी संतांसह वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या होत्या. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभुषने लक्ष वेधले. या वेळी भारूड, गवळणं,भजन देखील सादर केले. मुलांना प्रत्यक्षात पंढरपूरला आल्यागत वाटले. वेशभूषेचे पालकांनी देखील मोठ्या मनाने कौतुक केले. यशस्वितेसाठी उत्कर्ष विद्यालयाच्या व जिज्ञासा बालविहारच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.