कामकाज ठप्प : परभणी जिल्ह्यातील ४६४ महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

कामकाज ठप्प : परभणी जिल्ह्यातील ४६४ महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

परभणी : महसूल विभागातील कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होत परभणी महसूल विभागातील ४६४ कर्मचारी सोमवारपासून (१५ जुलै) बेमुदत संपावर गेले आहेत. यात ९३ अव्वल कारकून, १२२ महसूल सहायक, २ वाहन चालक, ४१ शिपाई आणि २०६ कोतवालांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता कर्मचारी कार्यालयात आले परंतु, त्यांनी दैंनदिन कार्यालयीन कामकाज हाती न घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या मांडला होता. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करून शासन निर्णय काढत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन असेच सुरु राहणार असल्याचे परभणी जिल्हा महसूल संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी याप्रसंगी सांगितले.

या संदर्भात यापूर्वी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. मागील बैठकांचे इतिवृत्त वाचन आढावा घ्यावा. सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा. अव्वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पद्दोन्नती देण्यात यावी. पुरवठा विभागातील महसूलचे कर्मचारी पुन्हा महसूल विभागात नियुक्त करावेत. तलाठी व महसुल सहायकांचा ग्रेड पे २४०० रुपये करावा. महसूल सहाय्यक व तलाठी यांना विभागीय दुय्यम सेवा परीक्षा व पदोन्नतीसाठी एकच परीक्षा पद्धत करण्यात यावी. महसूल सहाय्यक व तलाठी दोन्ही संवर्गासाठी पुर्वीप्रमाणेच एक समान परीक्षा पद्धती असावी. विषयांकीत अधिसूचनेप्रमाणे अव्वल कारकून यांची वेतन निश्चिती करण्यात यावी. महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतुदीनुसार सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी आदीसह अन्य पाच मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता कर्मचारी कार्यालयात आले परंतु, त्यांनी दैंनदिन कार्यालयीन कामकाज हाती न घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या मांडला होता. जोपर्यंत शासन मागण्या मान्य करून शासन निर्णय काढत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन असेच सुरु राहणार असल्याचे परभणी जिल्हा महसूल संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी याप्रसंगी सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!