वृक्षलागवडीची निसर्गवारी : सेलूच्या डीवायएसपी कार्यालय परिसरात कार्यक्रम

वृक्षलागवडीची निसर्गवारी : सेलूच्या डीवायएसपी कार्यालय परिसरात कार्यक्रम

मोरया प्रतिष्ठान आणि विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार 

सेलू जि.परभणी : गेल्या पाच वर्षांत लोकसहभागातून घनवन प्रकल्पाच्या माध्यमातून सेलू शहर व परिसरात ३५ हजार वृक्ष लागवड करणार्‍या सेलू येथील मोरया प्रतिष्ठान परिवार आणि विविध क्षेत्रातील संघटना, संस्थांच्यावतीने वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेअंतर्गत मंगळवारी, १६ जुलै रोजी निसर्गवारी काढण्यात आली. या वेळी १६ लिटर पाणी क्षमतेच्या ट्री गार्डसह ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसरात हा कार्यक्रम उत्साहात झाला. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे साहेब, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, तहसीलदार दिनेश झांपले, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, व्यापारी असोसिएशनचे अजित बिनायके, सेलूभूषण जयप्रकाश बिहाणी आदींसह मान्यवरांची उपस्थिती प्रमुख उपस्थिती होती.

वृक्षलागवडीची निसर्गवारी : सेलूच्या डीवायएसपी कार्यालय परिसरात कार्यक्रम

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत श्री झांपले यांनी व्यक्त केले. उद्योजक जयप्रकाश बिहाणी यांनी प्रत्येक नागरिकाने किमान दोन वृक्ष लागवड करून संगोपन करण्याचे आवाहन केले. वृक्ष संवर्धनासाठी सेलू व्यापारी असोसिएशनच्या वतीने २५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य जाहीर करण्यात आले. सेलू शहरातील नागरिकांनी सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा कायम जपल्याचे श्री.टिपरसे साहेब यांनी नमूद केले. प्रारंभी विठूमाऊलीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. सुजित मिटकरी यांनी आभार मानले. या उपक्रमामध्ये सेलू व्यापारी असोसिएशन, नूतन विद्यालय शिक्षण संस्था, पत्रकार संघ, वकील संघ, इंडस्ट्रिअल असोसिएशन, सिव्हील इंजिनियर असोसिएशन, रेल्वे प्रवासी संघ, हरित वृक्ष महिला मंडळ, सेलू महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, निरंकारी मंडळ, पेंशनर्स असोसिएशन, खानीचा मारोती कृती समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवा संघटना, राम बाग मित्र मंडळ, मेडिकल असोसिएशन,हपतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग समिती, नाभिक संघटना, रुग्णवाहिका ड्रायव्हर संघटना, परशुराम जन्मोत्सव समिती, सेलू पोलीस ठाणे, महसूल प्रशासन कर्मचारी, मोरया प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!