माजी नगराध्यक्षांपुढे वाचला समस्यांचा पाढा
कामे पूर्ण करण्याची गुलमोहर कॉलनीवासियांना आडळकरांची ग्वाही
सेलू जि.परभणी : माजी नगराध्यक्ष पवन आडळकर आणि रवी सुरवसे यांनी गुरुवारी (१८ जुलै ) सायंकाळी सेलू येथील गुलमोहर कॉलनीमधील नागरिकांच्या मागण्यांच्या दृष्टीने भेट घेऊन मूलभूत सोयीसुविधांविषयी जाणून घेतले. या वेळी नागरिकांनी विविध समस्यांचा पाढाच वाचला. कॉलनीमध्ये रस्ते, नाल्या व स्वच्छतेच्या प्रश्न असल्याचे निदर्शनास आणून दिले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाच्या पाण्याची व्हिलेवाट लावण्यासाठी नाल्या नाहीत. घाण पाणी रस्त्यावर येत आहे. घंटा गाडी येत नाही. त्यामुळे रस्त्यावर कचर्याचे ढीग साचले आहेत. या समस्या मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली. नाल्या बांधकाम पूर्ण करण्याचे तसेच स्वच्छतेसाठी घंटा गाडीची व्यवस्था तत्काळ केली जाईल, असे आश्वासन श्री आडळकर यांनी दिले. यावेळी हाजी युनुस कुरेशी, हाजी नूरमोहमद ईशानी, हाजी मोईन भाई, हाजी सत्तारभाई बागवान, मजीद भाई बागवान, कदीर भाई, शेख शकीलभाई, रशीदखान इजिनिअर, नईम बागवान, शेख रहीम टेलर, आसेफ कुरेशी, मुनाफ बागवान, मौजम सर,अकबरखान , शेख हुसेन निसार पठाण, सयद जावेद, हनीफ ईशानी, अफजल ईशानी, इम्रान कुरेशी, शोएब शेख आदींची उपस्थिती होती.