‘संतवाणी’ने सेलूतील रसिक मंत्रमुग्ध

‘संतवाणी’ने सेलूतील रसिक मंत्रमुग्ध

आषाढी एकादशी निमित्त नूतन विद्यालयाचा उपक्रम

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त संगीत विभागाच्या वतीने गुरुवारी (१८ जुलै) सादर करण्यात आलेल्या बालगायका कलाकारांच्या ‘संतवाणी’ने रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रजनन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया, सचिव डॉ. विनायकराव कोठेकर, शालेय समितीचे अध्यक्ष सिताराम, आदर्श वारकरी केशव भुसारे, मुख्याध्यापक संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय राम कृष्ण हरी’ आणि ‘सुंदर ते ध्यान’ या सामुदायिक नामस्मरणाने झाली. त्यानंतर प्रशांत इंगळे याने रूप पाहता लोचनी, तर राधिका परदेशी, ऋतुजा महाजन ऊठ पंढरीच्या राजा हा अभंग सादर केला. अबीर गुलाल उधळीत रंग हा अभंग कृष्णा पवार, विठ्ठल बोरसे, तर माझे माहेर पंढरी हा अभंग वैष्णवी बोठे, स्नेहल जोगदंड यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. समृद्धी राखे हीने जैसे ज्याचे कर्म तैसे, तुकोबाची अमृतवाणी प्रज्योत पांचाळ, नको देवराया अंत आता पाहू श्रुती कुलकर्णी, कानडा राजा पंढरीचा साईश भोसीकर, टाळ बोले चिपळीला पलश भुक्तर, ये गं ये गं विठाबाई दर्शना जोशी, संत तोची जाणा जगी आर्या घांडगे, जाता पंढरीशी अथर्व तोडकर, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वैष्णवी पिंपळगावकर, नको वाजवू श्रीहरी मुरली मानसी दलाल हीने सादर केले. सच्चिदानंद डाखोरे यांच्या
भैरवीने सांगता झाली. तबल्यावर आनंद राऊत मृदंग केदार तांबट, तर कार्तिक सातपुते, धनंजय गायकवाड यांनी ताल वादनाची साथसंगत केली.
निवेदन अतुल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष मलसटवाड, आदिती आंबेकर, बी.एस.हेलसकर, गणेश माळवे, एफ.के.गावित, सुनील तोडकर, उमेश शिरसागर, केशव डहाळे, अरुण रामपूरकर आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!