हुतात्मा बहिर्जी शिंदे स्मृती दिन : कान्हेकर शारदा विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप

हुतात्मा बहिर्जी शिंदे स्मृती दिन : कान्हेकर शारदा विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप

सेलू : समाजातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीची गरज असते. सामाजिक कार्यकर्ते ती मदत त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांचे हात बळकट करावे, असे आवाहन मुंजाभाऊ भिसे यांनी केले. सेलू येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात शुक्रवारी, १९ जुलै रोजी
हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कै.दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतुन सुरू असलेल्या ‘हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रसाद महाराज काष्टे, मनिष बोरगावकर, संस्था सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, डाॅ.आशिष डख, डाॅ.अशोकराव नाईकनवरे, डाॅ.शिवाजीराव शिंदे, संयोजक सुनिल गायकवाड, प्रल्हादराव कान्हेकर, बंडू नाना कदम, शुकाचार्य शिंदे, पी.के. शिंदे, विष्णू बागल, मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, बी.आर.साखरे उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील गायकवाड यांनी केले. कै.दत्तात्रय हेलसकर यांना स्मरूण व हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या प्रतीमेस अभिवादन करून ‘हात मदतीचा’ उपक्रम राबविण्यात शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व व मित्रपरिवार यांच्या सहकार्यातून हा उपक्रम चालतो, असे गायकवाड म्हणाले. आत्तापर्यंत शहरातील 2337 विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रसाद महाराज काष्टे, शुकाचार्य शिंदे, डाॅ.शिवाजीराव शिंदे, मनिष बोरगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, विजय हिरे यांनी केले. तर आभार ए.जी.पाईकराव यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष चारठाणकर, भरत रोडगे, संदिप जुमडे, रोहिदास चव्हाण, सिमा उंडे, आनंद देवधर, श्रीमती मुळे, बालासाहेब टरपले, विजय अंभुरे यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!