विमा कामगार संघटना : विमा रक्कमेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी

विमा कामगार संघटना : विमा रक्कमेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी

खासदार संजय जाधव यांना दिले निवेदन

परभणी : विमा कामगार संघटनातर्फे परभणीचे खासदारसंजय जाधव यांना विमा हप्त्यावरील जी.एस.टी.रद्द करावा. प्राप्ती कराच्या नव्या कर प्रणालीमध्ये विमा हप्त्याचे रक्कमेला बजावट द्यावी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील चारही सर्वसाधारण विमा कंपन्याचे एकत्रिकरण करावे. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कॉ. राजेश भालेराव, कॉ.शमशोद्यीन शेख, कॉ. देविदास नागेशी, कॉ. राजेंद्र कुलथे, कॉ. रामा धोत्रे आदी उपस्थित होते. मागण्यांचा सरकारकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन खासदार जाधव यांनी शिष्टमंडळाला दिले. विमा धारकांच्या हितासाठी म्हणून ऑल इंडिया इंशुरन्स एम्पलॉईज असोसिएशन या संघटनाच्या आवाहनानुसार देशातील सर्व खासदारांना भेटून त्यांना निवेदन देण्यात येत असल्याचे विमा कामगार संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!