अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा : रोडगे प्रिन्स इंग्लिश, ज्ञानतीर्थ विद्यालयाचे घवघवीत यश ; तनिष्का तेलभरे व बालाजी सूर्यवंशीची जिल्हास्तरासाठी निवड

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा : रोडगे प्रिन्स इंग्लिश, ज्ञानतीर्थ विद्यालयाचे घवघवीत यश ; तनिष्का तेलभरे व बालाजी सूर्यवंशीची जिल्हास्तरासाठी निवड

सेलू जि.परभणी : सेलू येथील यशवंत महाविद्यालयात राज्य विज्ञान व गणित संस्था नागपूरच्या वतीने
तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सोमवारी (२२ जुलै) आयोजिण्यात आला होता. यामध्ये श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश शाळाने प्रथम, तर ज्ञानतीर्थ विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, प्राचार्य मुकुंद सोळंके, परीक्षक चव्हाण, खरात यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन समन्वयक सुनीता काळे यांनी केले.‌ अंजली पद्माकर यांनी आभार मानले. विज्ञान मेळाव्यात इयत्ता आठवी ते दहावीच्या सेलू तालुक्यातील एकूण १७ शाळांनी सहभाग घेतला. मेळाव्याच्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता – संभाव्यता व आव्हान: या विषयावर एलकेआर:रोडगे प्रिन्स इंग्लिश शाळेच्या इयत्ता तनिष्का तेलभरे हीने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळविला. नारायण चौरे यांचे तिला मार्गदर्शन मिळाले. ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या बालाजी सूर्यवंशी या विद्यार्थ्यांने पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण करून द्वितीय क्रमांक मिळविला.‌ पवार यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले. तर नूतन विद्यालयाच्या दुर्गा मगर हीने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले आहे. श्रीराम प्रतिष्ठानच्या तनिष्का तेलभरे व बालाजी सूर्यवंशी या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी झाली आहे. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सविता रोडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर यांनी अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!