एक मूल एक झाड : सेलूतील यासेर उर्दू शाळेचा अभिनव उपक्रम
सेलू : येथील गौरव सेवाभावी संस्थेच्या यासेर उर्दू प्राथमिक शाळेत ‘एक मूल एक झाड’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी चिंच, लिंब आणि जांभूळ आदी प्रकारच्या झाडांची ५०० रोपे तयार करण्याचा संकल्प केला आहे.
तयार झालेली रोपे शाळेच्या परिसरात तसेच शहराच्या विविध ठिकाणी लावली जाणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष रहीम खान पठाण यांच्या वतीने पॉलिथिन व बियाणे, खत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरणाचा महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्याचे वाढते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी झाडांची लागवड खूप आवश्यक आहे. हेच या उपक्रमातून शिकायला मिळत आहे. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जावेद खान पठाण , सय्यद इमरान, शेख राहील, सय्यद अजीम, सय्यद अमन, शेख साजिद, सिमा खान, नजमा पठाण, ताहेमीना खान, मविया हाशमी, नफिसा बाजी आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.