गंगाखेडचे सुशांत चौधरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; विधानसभा निवडणुकीची समिकरणे बदलणार !

गंगाखेडचे सुशांत चौधरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; विधानसभा निवडणुकीची समिकरणे बदलणार !

गंगाखेडचे सुशांत चौधरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; विधानसभा निवडणुकीची समिकरणे बदलणार !
गंगाखेड : गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी यांनी आपले बाजार समिती संचालक पुत्र सुशांत चौधरी यांचेसह शुक्रवारी, २६ जुलैरोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचेसोबतच माजी सभापती बालासाहेब निरस हेही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तंबूत दाखल झाले आहेत. या पक्ष प्रवेशामुळे गंगाखेड विधानसभा निवडणुकीचे समिकरणच बदलले असून उमेदवारीसाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शुक्रवारी परभणी दौऱ्यावर होते. पूर्वी पासूनच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असलेले चौधरी आणि निरस यांनी श्री पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी चौधरी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केला आहे. आजपर्यंत माजी आमदार सीताराम घनदाट हेच एकमेव दावेदार असलेल्या राष्ट्रवादीकडे आता उमेदवारी साठी सक्षम पर्याय ऊपलब्ध झाले आहेत. लोकसभा निवडणूकीपासून सुरू झालेल्या जातीपातीच्या गणितांचा विचार करता पक्ष उमेदवारी देताना वेगळा विचार करतो काय ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अडथळ्यांची शर्यत

आज राष्ट्रवादीत मोठे पक्ष प्रवेश झाले असले, तरी सुशांत चौधरी यांच्यासाठी उमेदवारी मिळवणे ही अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे. मागील निवडणूकीत शिवसेनेकडे असलेला मतदार संघ आता राष्ट्रवादीला सोडला जाईल का ? हा कळीचा मुद्दा असणार आहे. लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या खासदार संजय जाधव यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला असून खासदार जाधव यांची या संदर्भातली भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेने आपला दावा सोडल्यास राष्ट्रवादीकडून माजी आमदार घनदाट, सुशांत चौधरी यांच्या नावाचा विचार होईल. जातीच्या गणितांवर घनदाट बाजुला केले जावू शकतात. या परिस्थितीत युवा उमेदवार म्हणून सुशांत चौधरी यांच्या नावाचा विचार वरीष्ठपातळीवरून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!