शिक्षण सप्ताह : सेलूतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वृक्षारोपण
मोरया प्रतिष्ठानचे सहकार्य
सेलू : शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत शनिवारी, २७ जुलैरोजी मोरया प्रतिष्ठानच्या सहकार्याने वृक्षारोपण व वृक्ष संगोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका सुनिता वेडे, गृहप्रमुख प्रेरणा पवार, मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर, सदाशिव बर्वे, सुजित मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सुनिता वेडे यांनी केले. उपस्थित 150 विद्यार्थिनींना मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी वृक्ष संवर्धनाची व संगोपनाची शपथ दिली. उपस्थित पालकांचा देशी वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ‘एक मूल एक झाड’ हा संदेश दिला. सूत्रसंचालन कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी केले. आभार सुहास नवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सुमित्रा पवार, अश्विनी बोराडे, वनदेवी वाघमारे, योजना कातकडे, शितल अवचार, बेबी केंद्रे, सुजाता सेलूकर , अनुसया शिंदे,आम्रपाली कांबळे , रावसाहेब पदमपल्ले आदींनी पुढाकार घेतला.