नागरी मंच – समस्या सेलूच्या : रस्त्यात खड्डे; की खड्ड्यात रस्ता
♦नागरिकांना आवाहन : आपल्या भागातील नागरी समस्या आमच्यापर्यंत कळवा. सोबत समस्या दर्शविणारा एखादा फोटो जरूर पाठवा. समस्या व आपले म्हणणे सकाश न्यूजमध्ये प्रकाशित करून आपला आवाज बुलंद केला जाईल. समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात. नागरी मंच – समस्या कळवा या ईमेल : sakashnews@gmail.com
सेलू शहरातील रायगड कॉर्नर जवळील लोकमंगल नगर हा भाग सेलू नगरपालिकेच्या हद्दीत येतो. येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून पालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे बंधनकारक असतानाही, प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत मार्ग काढावा लागतो. वाटेत मोठमोठे खड्डे असल्यामुळे पाणी साचते, आणि त्यामुळे वाहन घसरते व पायी चालणाऱ्यांचे पाय घसरतात.
शाळेतील मुलांची बस किंवा ऑटो खड्ड्यांमुळे घराजवळ येऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना जीव मुठीत धरून, चिखल तुडवत शाळेत जावे लागते. पालिकेने मुलभूत सुविधा पुरवणे अत्यावश्यक असतानाही, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. पालिकेकडे नागरी सुविधांचा अभाव असून, दुसरीकडे नागरिकांकडून कर वसुली जोरात चालू आहे. मुख्याधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न प्रशासनाने तात्काळ सोडवावा, अशी मागणी लोकमंगलनगरमधील रहिवाशांकडून होत आहे.
गणेश नगर मधिल सर्वात पाठिमागची साईड,मुळे सर यांच्या बालवाडी पासुन पुढे,अगदी अर्ध वट रस्ता खोदकाम करून ठेवलेले आहे त्या मुळे तेथे राहणाऱ्या नागरीकाचे हाल होत आहेत ति कृपया या कडे संबंधीत विभागाने दाखल घेऊन कार्य करावे