शिक्षण सप्ताह : सेलूतील जिजामाता बाल विद्यामंदिर शाळेत विविध कार्यक्रम

शिक्षण सप्ताह : सेलूतील जिजामाता बाल विद्यामंदिर शाळेत विविध कार्यक्रम

सेलू : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २८ या कालावधीत सेलू येथील जिजामाता बाल विद्यामंदिर शाळेत, शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अध्ययन अध्यापन साहित्य तयार केले. मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस या अंतर्गत गणिताचे प्रयोग सादर करण्यात आले. क्रीडादिनानिमित्त स्थानिक खेळ घेण्यात आले. सांस्कृतिक दिवसानिमित्त विविध गुणदर्शन, देशभक्तीपर गाणे तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शुक्रवारी विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्हीवर डिजिटल कौशल्यात्मक कार्यक्रम दाखविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी कौशल्यात्मक विविध वस्तू व व्यवहार ज्ञानाच्या गोष्टी आत्मसात केल्या. शनिवारी मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात शाळेमध्ये इको क्लब स्थापन करण्यात आला. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहीम विद्यार्थ्यांच्या घरोघरी माता पालक यांचे सह्यायाने राबविण्यात आली. रविवारी शिक्षक सहभागाने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहातील उपक्रम तसेच इको क्लबच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली टिकून ठेवणे शाश्वत अन्नप्रणालीचा अवलंब करणे, ई-कचरा कमी करणे, ऊर्जेची बचत करणे, पाणी वाचविणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आदी उपक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी दिली. सप्ताहात विद्यार्थी, पालक, शिक्षक सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रवींद्र पाठक विजयमाला काळे, कृष्णकांत खापरखुंटीकर, भगवान पावडे, विष्णू कटारे, सुनील राठोड, मंगेश शेळके , बाळू धनवे, लता अंभुरे व सादेखा बाजी आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!