दिव्यांग विद्यार्थ्यांना चादर, शालेय साहित्य वाटप; जिंतूर शहरासह तालुक्यात वृक्षलागवड
संभाजी ब्रिगेड : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त उपक्रम
जिंतूर : मराठा आरक्षण चळवळीचे प्रणेते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजी ब्रिगेड वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना चादर व शैक्षणिक साहित्य वाटप करुन विविध ठिकाणी वृक्ष लागवड करत गुरूवारी, एक ऑगस्टरोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, उपोषण दरम्यान लाठीचार्ज केल्यामुळे अंतरवाली सराटी येथील महिला,वयोवृद्ध नागरिक लहान मुले मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. परिणामी महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झाला होता. यावेळी समाजाने मराठा समाजाचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये जिंतूर शहरातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्री संत पाचलेगावकर महाराज निवासी अस्थिव्यंग ( दिव्यांग) विद्यालयात विद्यार्थ्यांना चादर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शिवाय सोस,जोगवाडा, बामणी,भोसी,ऐसेगाव,पिंपलगाव काजळे,आडगाव दाभाडे यासह विविध गावात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, तालुका अध्यक्ष माधव दाभाडे, शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष शरद ठोंबरे,अनिल दाभाडे,संजय गायके,विलास रोकडे, संतोष शिंदे,बाळासाहेब शेळके,अनिल गाडेकर,सोपान धापसे यांच्यासह संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते