अभिवादन : प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

अभिवादन : प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

सेलू : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ.संजय रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, उपमुख्याध्यापक राजेंद्र जाधव व शिक्षक उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी कामगार वर्गाला राष्ट्रीय चळवळीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. जनतेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची त्यांनी सुरवात केली. ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची दिशा आणि दशा बदलली. यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरित केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. या कार्यक्रमा अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी थोर महान व्यक्तींबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!