विविध कार्यक्रमांव्दारे लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

विविध कार्यक्रमांव्दारे लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

विविध कार्यक्रमांव्दारे लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

परभणी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सेलू येथील नूतन रोड वरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच बाबासाहेब रोडवरील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम झाला. माजी आमदार विजय भांबळे, अशोक नाना काकडे, प्रकाशराव मुळे, सुधाकर रोकडे, रणजीत, गजमल, विठ्ठल काळबांडे, अशोक उफाडे, निर्मलाताई लीपणे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. नगरपालिकेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुख्याधिकारी देविदास जाधव, मिलिंद सावंत, प्रभाकर सुरवसे, नथुराम अंभोरे, शुभम धुत, सुनील धापसे, अजय धापसे, अनिल मुजमुळे, दीपक अंभोरे आदींची उपस्थिती होती. सेलू तालुक्यातील वालूर येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.‌ माजी आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संजय साडेगावकर, प्रकाशराव मुळे, सुधाकर रोकडे, लिंबाजी कलाल, गणेशराव मुंडे, इस्माईल सेठ आदींची उपस्थिती होती.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!