धारणा बदलण्याचे काम पुस्तके करतात : डॉ.दुर्गादास कान्हडकर

धारणा बदलण्याचे काम पुस्तके करतात : डॉ.दुर्गादास कान्हडकर

पुंगळा येथील जिल्हा परिषद शाळेला १०१ आनंदी वाचनपेटी भेट, एचएआरसी संस्थेचा उपक्रम

जिंतूर : चांगले पुस्तक व चांगले मित्र हे नशिबाने मिळतात.या दोन्हीच्या सहवासात आपले जीवन उज्वल होते त्यामुळे त्यांच्याशी मैत्री टिकवून ठेवावी तसेच पुस्तके मनातील धारणा बदलण्याचे काम करतात, आपल्या एका आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचे अनुभव देतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन व्यासंग जपला पाहिजे असे प्रतिपादन डॉ.दुर्गादास कान्हडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

पुंगळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १०१ आनंदी वाचनपेटी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुरलीधर हजारे तर प्रमुख अतिथी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, डॉ दुर्गादास कान्हडकर, एचएआरसी उपाध्यक्ष डॉ.शैलेश मंत्री, अक्षर आनंदचे जिल्हा समन्वयक प्रकाश डुबे उपस्थित होते. संस्थेमार्फत आनंदी वाचन पेटी भेट देण्याचा उपक्रम मागील काही दिवसापासून सुरू आहे. आतापर्यंत परभणी, हिंगोली व जालना, बीड व पुणे जिल्ह्यातील १०१ शाळांना ही आनंदी वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी हा अभिनव उपक्रम राबविण्यामागील हेतू स्पष्ट करत हे कार्य करताना अनेक दाते मदतीचा हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कुयरेवार तर आभार प्रदर्शन मुरलीधर हजारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप पवार, हुकचंद आढे, संगीता बोपीनवार, सोनिया तायडे, सिमितीनी देशमाने यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी,पालक व गावकरी उपस्थित होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी : वाढदिवसाकरिता होणारा अतिरिक्त खर्च टाळून शर्वरी पवन चांडक हीने ‘आनंदी वाचनपेटी’ साठी आर्थिक मदत केली. ज्यातून एचएआरसी तर्फे या शाळेला १०१ पुस्तकांची आनंदी वाचनपेटी शाळेस भेट देण्यात आली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!