लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन : विवेकानंद प्राथमिक, नूतन विद्यालयात कार्यक्रम
सेलू : लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी साठे व टिळक यांच्या चरित्र व कार्यावर भाषणाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. नूतन विद्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, काशिनाथ पल्लेवाड, शिल्पा बरडे, पी.टी.कपाटे, सुरेश हिवाळे, एस.बी.मलसटवाड, एस.व्ही.सांगुळे आदींची उपस्थिती होती.