‘जागर श्यामच्या कथांचा’ उपक्रमाला उत्साहात सुरूवात 

‘जागर श्यामच्या कथांचा’ उपक्रमाला उत्साहात सुरूवात 

हेलस साने गुरुजी कथामाला शाखेचा उपक्रम : पहिल्याच दिवशी विविध शाळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस ( ता.मंठा) आयोजित ‘जागर श्यामच्या कथांचा’ या उपक्रमास गुरूवारपासून ( १ ऑगस्ट) उत्साहात सुरुवात झाली आहे, अशी माहिती हेलस शाखेच्या अध्यक्ष कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी दिली आहे.

यंदाचे वर्ष पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. हेलस साने गुरुजी कथामाला शाखेने तीन दशकांची वाटचाल पूर्ण केली आहे. या निमित्ताने शिक्षणाबरोबरच सुसंस्कार व मनोरंजनही व्हावे, या उद्देशाने पूज्य साने गुरुजींच्या ‘ श्यामचीआई ‘ पुस्तकातील ४२ कथांचा समावेश असलेल्या ‘ जागर श्यामच्या कथांचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागी शाळांना दररोज एक कथा या प्रमाणे ४२ दिवस ४२ कथा शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये पाठविण्यात येतील. कथा परिपाठामध्ये मुलांना ऐकविण्याची व्यवस्था व्हावी. शिवाय मुलांच्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्येदेखील पाठविता येईल. ४२ कथा ऐकून झाल्यावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन दिले जाणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभागी होण्यासाठी शिक्षकांनी ९४२००३६९३५ या मोबाईल क्रमांकावर तसेच helaskathamala.blogspot.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे, संयोजिका कल्पना दत्तात्रय हेलसकर तसेच संयोजन समितीचे डॉ.सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे, आर.आर.जोशी, जमीर शेख आदींसह विविध शाळांतील शिक्षक, कथामाला कार्यकर्ते उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.

‘जागर श्यामच्या कथांचा’ हा उपक्रम करोना काळात सुरू करण्यात आला होता. उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. कथांची उत्कृष्ट अभिवाचन निर्मिती छत्रपती संभाजीनगर येथील श्री.राजेंद्र जोशी यांची आहे. उपविभागीय अधिकारी अंजली धानोरकर यांनी आपल्या रसाळ वाणीतून अभिवाचन केले आहे. गतवर्षी महाराष्ट्रासह गोवा राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपक्रमात व ऑनलाईन परीक्षेत सहभाग नोंदविला होता. यावर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. अशी माहिती हेलस येथील साने गुरूजी कथामालेच्या अध्यक्ष तथा संयोजिका कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी दिली.


‘जागर श्यामच्या कथांचा’ WhatsApp community ग्रुपमध्ये खालील लिंकव्दारे जॉईन होता येईल… 

Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/CFRkLFQIysH0TuoSyUEBNq

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!