अटल मॅरेथॉन : सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश शाळेची राष्ट्रीयस्तरावर भरारी
मराठवाड्यातील एकमेव शाळा : ‘गॅस लिकेज डिटेक्टर’ या वर्किंग मॉडेलची निवड
सेलू : ‘सामाजिक अडचणीसाठी तंत्रज्ञान’ या विषयावर देशपातळीवर आयोजित अटल मॅरेथॉन स्पर्धेत सेलू (जि.परभणी) येथील एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेलची निवड झाली आहे. इयत्ता दहावीतील साहिल राठोड, व्हिजन खाडे व पुष्कर पुरी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘गॅस लिकेज डिटेक्टर’ या वर्किंग मॉडेलने भारतातून १०६ वे स्थान मिळविले आहे. स्पर्धेत भारतभरातून पाचशे मोडेलमध्ये आले होते. या स्पर्धेत मराठवाड्यातून निवड झालेली एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल ही एकमेव शाळा आहे. मॉडेल तयार करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना अटल टिंकरिंग लॅब उपलब्ध करून दिलेली आहे. या लॅबमध्येच विद्यार्थ्यांनी गॅस लिकेज डिटेक्टर या मॉडेलची पूर्ण तयारी केली होती. स्पर्धेत निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.