यादें मोहम्मद रफ़ी की : गायनातून रफ़ी साहब यांच्या स्मृतींना उजाळा
सेलूतील ‘आम्ही कलाकार’ समूहाची आदरांजली
सेलू : मोहम्मद रफी यांच्या ४४ व्या स्मृतीदिनानिमित्त सेलू येथील “आम्ही कलाकार” समूहाच्या वतीने बुधवारी, ३१ जुलै रोजी मोहम्मद रफी यांनी गायलेल्या अजरामर गीतांना सादर करून स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी जेष्ठ रसिक सी.आर.कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, जगदीश मिश्रीकोटकर आदी मान्यवरांच्या हस्ते मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गायक मोहम्मद रफी यांच्या स्मृतीला जागवत कलाकारांनी सुंदर गीते सादर केली. मन तडपत हरी दर्शन को, तुम मुझे युं भूला न पाओगे गीत सच्चिदानंद डाखोरे, कौन है जो सपनो मे आया पुकारता चला हूं मैं- लक्ष्मीकांत दिग्रस्कर, तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है -पूजा तोडकर, हसा मुलांनो हसा -संतोष कुलकर्णी, मेरे देश में, ले गयी दिल गुडिया जपान की -शिरीष संगई, अकेले है चले आओ-अनघा पांडे, जानेवालो जरा मुडके देखो, तू गंगा की मौज -सुरेंद्र दिशागत, लिखे जो खत तुझे- सतीश ताठे, एहसान तेरा होगा मुझपर- सायली दिग्रसकर यांनी सादरीकरण केले. याशिवाय युगल सादरीकरण सुध्दा करण्यात आले. प्रास्ताविक जयश्री सोन्नेकर यांनी, तर सूत्रसंचालन अशोक जयस्वाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी मुळावेकर, गिरीश दीक्षित, चंद्रहास पटेल, सय्यद मुनीर, गंगाधर कान्हेकर, केशव डहाळे, अरुण रामपुरकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर, अशोकनाना काकडे, पत्रकार श्रीपाद कुलकर्णी, मनीष कदम, उज्ज्वला भाला, तुळशीराम घोडके आदींसह रसिक श्रोते आणि मान्यवरांची उपस्थिती होती.