ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नांतील सातत्य गरजेचे: डॉ.सुनीता दीक्षित यांचे प्रतिपादन

ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नांतील सातत्य गरजेचे: डॉ.सुनीता दीक्षित यांचे प्रतिपादन

सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंतांचा सत्कार

सेलू : विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी ज्ञाननिष्ठा, गुरुनिष्ठा, अध्ययननिष्ठा, एकाग्रता चतु:सूत्रीचा अवलंब करून नेहमी ध्येय मोठे ठेवावे आणि ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्नांतील सातत्य राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.सुनीता दीक्षित-देशपांडे यांनी गुरूवारी, एक ऑगस्टरोजी केले.
श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.दीक्षित बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, अजीजखाॅ पठाण, मुख्याध्यापिका निशा पाटील, दत्तराव घोगरे, रोहिदास मोगल, माधुरी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतगीत सच्चिदानंद डाखोरे यांनी गायले. प्रास्ताविक मुख्याध्यापिक निशा पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुहास देऊळगावकर यांनी दिला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉ.दीक्षित यांचा डॉ.लोया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कैलास मलवडे, सुरेखा आगळे, सीमा सुक्ते, वैशाली चव्हाण, ज्योती कुंभकर्ण, यशवंत कुलकर्णी, सपना पाटणी आदींसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!