माजी आमदार भांबळे यांना धक्का : माजी जिप अध्यक्ष प्रसाद बुधवंत काँग्रेसमध्ये

माजी आमदार भांबळे यांना धक्का : माजी जिप अध्यक्ष प्रसाद बुधवंत काँग्रेसमध्ये

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत जिंतूर तालुक्यातील अनेकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

जिंतूर : माजी आमदार विजय भांबळे यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिंतूर- सेलू विधानसभा अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, धनगर समाज उन्नती मंडळाचे परभणी जिल्हाध्यक्ष अनंतराव कोरडे मामा आदींसह जिंतूर सेलू तालुक्यातील अनेकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२ ऑगस्ट) काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश नागरे, जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, विशालराव बुधवंत, शहराध्यक्ष बासू खान, सुधाकर नागरे आदी उपस्थित होते. या वेळी कवडा सरपंच राजेश चव्हाण, माजी नगरसेवक नियाजू खान गफुर खान उर्फ न्याजुलाला, अफसर बेग, सेलूचे रहीम खान पठाण, याहा खान, अयुफभाई सदर, सय्यद मुस्ताफा आदींचा जाहीर प्रवेश झाला.
माजी आमदार विजय भांबळे यांची मजबूत असलेली साखळी ज्यात नानासाहेब राऊत, राजेंद्र नागरे, अविनाश काळे यांनी या पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला चिडचिट्ठी दिली होती. नेमके विधानसभा व स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गट यांची जिंतूर-सेलू धुरा सांभाळणारे प्रसाद बुधवंत यांच्यासह अनेकांचा काँग्रेसमध्ये झालेला प्रवेश माजी आमदार विजय भांबळे यांना धक्का असल्याचे मानले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर आउटगोइंग-इनकमिंग सुरूच असते. पण ज्या पक्ष्याने, नेत्याने जिल्हा परिषदेची उमेदवारी, अध्यक्षपद अशी भरभरून ताकद देऊन सुद्धा नानासाहेब राऊत, राजेंद्र नागरे, अविनाश काळे व आता प्रसाद बुधवंत यांनी विजय भांबळे यांना सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे ‘निष्ठावान’ हा शब्द आता सोयीचे राजकारण करणारा वाटत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रवेशाबाबत प्रसाद बुधवंत यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, कॉंग्रेसमधील जाहीर प्रवेशाचे जिंतूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!