Rodge Prince English School : ‘गॅस लिकेज डिटेक्टर’च्या पेटंटसाठी प्रयत्न करणार : डॉ.संजय रोडगे

Rodge Prince English School : ‘गॅस लिकेज डिटेक्टर’च्या पेटंटसाठी प्रयत्न करणार : डॉ.संजय रोडगे

अटल मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार, ‘गॅस लिकेज डिटेक्टर डिवाइस’ची राष्ट्रीयस्तरावर निवड

अटल मॅरेथॉन २०२३-२४ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या व्हिजन खाडे, साहिल राठोड, पुष्कर पुरी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘गॅस लिकेज डिटेक्टर डिवाइस’ची ५०० प्रयोगात निवड झाली. ही शाळेसाठी अभिमानास्पद बाब आहे. या डिवाइसचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी दिली आहे.

सेलू जि.परभणी : नीती आयोग द्वारा संचालित भारत सरकारच्या अटल इनोवेशन मिशनच्या अटल मॅरेथॉन २०२३-२४ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील अव्वल ५०० विजयी संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सेलू (जि.परभणी) येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या संघाने अतुलनीय यश मिळविले आहे.

शाळेच्या व्हिजन खाडे, साहिल राठोड, पुष्कर पुरी यांनी तयार केलेल्या ‘गॅस लिकेज डिटेक्टर डिव्हाईस’ ची १०६ क्रमांकावर निवड झाली आहे. या स्पर्धेत देशभरातील २० हजारापेक्षा जास्त शाळांचा सहभाग होता. एकूण २८ राज्यांच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले होते. मराठवाड्यातून निवड झालेला प्रिन्स इंग्लिश स्कूलचा एकमेव संघ ठरला आहे. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी शाळेतील ‘अटल टिंकरिंग लॅब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. या लॅबचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांनी अटल मॅरेथॉन स्पर्धेसाठी केला. विद्यार्थ्यांनी कम्प्युटर प्रोग्रामिंग सोबत समाजपयोगी ‘गॅस लिकेज डिटेक्टर डिवाइस’ तयार केले. विज्ञान शिक्षक नारायण चौरे, राजेंद्र देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल व्हिजन खाडे, साहिल राठोड, पुष्कर पुरी, तसेच तनिष्का तेलभरे, स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, ममिता सिंग, मीरा मिरांदा आदींची उपस्थिती होती. या सूत्रसंचालन योगिता, तर आभार मिलिंद खंदारे यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!