मराठवाडा सामाजिक फाऊंडेशनची
आढावा बैठक सेलूमध्ये उत्साहात
सेलू : मराठवाडा सामाजिक फाऊंडेशनची सेलू तालुकास्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक संजय रोडगे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा सामाजिक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरपले होते. या वेळी फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष डी.एस कातारे पाटील, कार्याध्यक्ष शिवाजीराव बल्लाळ, सचिव मा. पंडितराव बोराडे, प्रदेश संघटक महादेवराव गायके, मंठा तालुका सचिव भगवानराव गायकवाड, ओंकारेश्वर गांजवे, परभणीचे पदाधिकारी बाबा कातकडे प्रमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत सेलू तालुका उपाध्यक्षपदी त्र्यंबक पितळे यांची, तर सेलू तालुक्यातील सर्कल, उपसर्कल प्रमुख प्रमुख म्हणून चिकलठाणा – गोविंदराव शिंदे, देऊळगाव गात-हनुमान माने, नागेश काळे, रवळगाव-परमेश्वर चौरे, शिवाजीराव सरोदे, कुपटा- गणेश किटाळे यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरपले यांनी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. डॉ.संजय रोडगे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला दामोधर (बापू) दळवे, आबासाहेब मोगल, सरपंच सुदाम रोकडे, एकनाथ कारके, संतोष कारके, सरपंच दीपक रोडगे, ज्ञानेश्वर चौरे, संजय गटकळ, परमेश्वर गाते आदीसह सेलू तालुक्यातील फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेलू तालुकाध्यक्ष लिंबाजीराव कलाल, सचिव विठ्ठलराव काळे, उपाध्यक्ष परमेश्वर राऊत, तालुका संघटक सोमेश्वरराव गिराम आदीसह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.