महिलांसाठी निबंध, गवळण गायन स्पर्धांचे आयोजन 

महिलांसाठी निबंध, गवळण गायन स्पर्धांचे आयोजन 

सेलू महिला मंडळाचा उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहन 

सेलू : महिला मंडळ, सेलूद्वारा सेलूतील सर्व महिलांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त निबंध स्पर्धा आणि गोकुळाष्टमी निमित्ताने गवळण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर यांनी ही माहिती दिली. स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

निबंध स्पर्धेचा विषय : ‘मी सेलूची नगराध्यक्षा झाले तर…’ असा आहे. निबंध स्पर्धा नियम व अटी : 1.निबंध लेखनासाठी शब्द मर्यादा.. 300 शब्द. 2. निबंधाचे लेखन कागदाच्या एका बाजूस, योग्य समास सोडून स्वहस्ताक्षरात असावे. 3. निबंधामध्ये कुठेही आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता याचा उल्लेख नसावा. 4. महिलेने आपले निबंधलेखन पूर्ण झाल्यावर, आपले नाव पत्ता व मोबाईल नंबर आपल्या स्वाक्षरीसह वेगळ्या स्लीपवर लिहून ही स्लीप निबंधाला स्वतंत्र जोडावी. 5. निबंध व ही स्लिप एका पाकिटात बंद करुन हे पाकीट संयोजकाकडे पाठवावे. 6. निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2024 असेल. 7. यानंतर निबंध स्वीकारले जाणार नाहीत. 8. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 9. यशस्वी स्पर्धकांना खालील प्रमाणे पारितोषिके दिली जातील. प्रथम रुपये 1000, द्वितीय रुपये 700, तृतीय रुपये 500, उत्तेजनार्थ रुपये 200. सहभागी होण्यासाठी संयोजिका ललिता गिल्डा 9657846607 आणि वसुधा खारकर 9075402215 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन, महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई कोठेकर यांनी केले आहे.

♦गवळण गायन स्पर्धा नियम व अटी

1) ही स्पर्धा ग्रुप मध्ये होईल. 2) ग्रुपमध्ये तीन ते पाच महिला सहभागी होऊ शकतात. 3) वाद्य विरहित गायन व सादरीकरण असावे. फक्त टाळाचा वापर करता येईल. 4) गवळणी चे गायन ग्रुप मधील स्पर्धकानेच करावे. (मोबाईल टेप मृदुंग चालणार नाही) 5) सादरीकरणाचा वेळ तीन ते पाच मिनिट राहील. 6) राधा कृष्णाच्या वेशभूषा सहित हावभाव सादरीकरण.7) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.8) गटप्रमुखाचे नाव व गाण्याचे बोल व फोन नंबर संयोजकाकडे द्यावे. 9) गवळण गायन हिंदी मराठी भाषेत चालेल. 10) फक्त महिलांनी सहभाग नोंदवावा. विजेत्यांना प्रथम – 1000 रूपये, द्वितीय – 700 रूपये, तृतीय – 500 रूपये आणि उत्तेजनार्थ – 200 रूपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट 2024 पर्यंत संयोजिका करुणा बागले कुलकर्णी 84210 25062, मधुरा खारकर 87881 54785 यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन सेलू महिला मंडळाच्या अध्यक्षा विजयाताई कोठेकर यांनी केले आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!