व्यवसाय शिक्षण : विद्यार्थिनींची कोहिनूर रोप्स फॅक्टरीला भेट

व्यवसाय शिक्षण : विद्यार्थिनींची कोहिनूर रोप्स फॅक्टरीला भेट

सेलूतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा उपक्रम 

सेलू : शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील ५० विद्यार्थिनींनी व्यवसाय शिक्षण अंतर्गत मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी कोहिनूर रोप्स रस्सी कारखाना येथे भेट दिली. या वेळी बालिकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. बालिका सोबत व्यवसाय प्रशिक्षक शितल अवचार, अनुसया शिंदे, अनिता काळे, कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर उपस्थित होते.

कच्चा मालाची आयात व पक्क्या मालाची निर्यात, ४ एमएम दोरपासून ते ४० एमएम दोर कसा बनतो. तयार माल पॅकिंग करून विक्री केला जातो. परदेशात या मालाची निर्यात होते. कोहिनूर आणि मनोरमा या दोन कारखान्यांमध्ये दोन शिफ्ट मध्ये येथे २००० व्यक्तींना रोजगार दिला जातो. आदी बाबींविषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. व्यवस्थापक वल्लभशेठ बाहेती यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शैलेश विटेकर, राजू बुरकुले, अमोल हजारे यांनी बालिकांना माहिती दिली. साक्षी टाकरास हीने आभार मानले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनीता वेडे, सुमित्रा पवार यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!