मुख्याध्यापक संघाचे धरणे आंदोलन

मुख्याध्यापक संघाचे धरणे आंदोलन

टप्पा अनुदान, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

परभणी : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मंगळवारी, सहा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते सहा या वेळेत विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील अंशतः अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रचलित धोरणानुसार अनुदान टप्पा तात्काळ लागू करावा. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व १ नोव्हेंबर २००५ नंतर अनुदानावर आलेल्या विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी. १५ मार्च २०२४ चा सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून शाळा तेथे मुख्याध्यापक पद हे धोरण असावे. १५ मार्च २०२४ रोजीचा वर्ग ५ वी व ८ वीच्या वर्गाचा दर्जा वाढ निर्णय तात्काळ रद्द करावा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती तात्काळ सुरू करावी. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कॅशलेस मेडिकल योजना तात्काळ लागू करावी. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!