वृक्षसंवर्धन काळाची गरज : डॉ.संजय रोडगे यांचे प्रतिपादन
प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण
सेलू : जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील मानव, सजीवांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. शुद्ध हवा ऑक्सिजन हवा असेल, तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष फक्त पाणी फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याचे ऊर्जा देतात. नवी आशा, उमेद देतात. त्यामुळे काळाची गरज बनलेली वृक्षसंवर्धनाची चळवळ लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी केले.
श्रीराम प्रतिष्ठान संचलित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण अभियान अंतर्गत बुधवारी (७ ऑगस्ट) विद्यार्थी व पालकांनी वृक्षारोपण केले. यावेळी डॉ.रोडगे बोलत होते. याप्रसंगी सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, रुचिका गुप्ता, अनंत तेलभरे आदींची उपस्थिती होती.
डॉ. रोडगे म्हणाले, ” बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली. परंतु आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आहोत याचेच वाईट परिणाम आज आपण पाहत आहोत. अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड आणले होते. पालकांसमवेत विद्याविहार संकुल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांची देखभाल विद्यार्थी करणार आहेत. वृक्षारोपण अभियानासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.