जीवनातील आनंदाच्या वाटा : प्रा.डॉ.संजय कळमकर यांचे सेलूत व्याख्यान
वसंत प्रतिष्ठानचा उपक्रम : आज सायंकाळी सहा वाजता साई नाट्यगृहात व्याख्यान
सेलू : येथील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीदिन व माजी नगराध्यक्ष ॲड.वसंतराव खारकर (मामा) ह्यांच्या स्मतृप्रित्यर्थ शुक्रवारी (९ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध विनोदी लेखक आणि कथाकथनकार प्रा.डॉ.संजय कळमकर (न्यू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नगर) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. “जीवनातील आनंदाच्या वाटा” हा व्याख्यानाचा विषय आहे. साई नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता व्याख्यान आहे. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक महेश खारकर, ॲड.उमेश वसंतराव खारकर व संयोजन समितीने केले आहे.