केमापूरच्या शाळेत आरोग्य जागर 

केमापूरच्या शाळेत आरोग्य जागर 

प्रात्यक्षिकांद्वारे आरोग्यसेवकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सेलू : सेलू तालुक्यातील केमापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शनिवारी, १० ऑगस्टरोजी ‘आरोग्य जागर’ कार्यक्रम झाला. या वेळी मार्गदर्शन करतांना आरोग्यसेवक व्ही.व्ही.कुरवाडे यांनी वैयक्तिक स्वच्छतेसह परिसर स्वच्छता महत्त्वाची असल्याचे असल्याचे सांगितले.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ.शरद ठाकर होते. याप्रसंगी सीएचओ डाॅ.नुसरत फारूकी, ग्रामसेवक जे.एम. देशमुख, आरोग्य सेवक एन.आर.वराडे, ए.बी.शिंदे उपस्थित होते. परिसर स्वच्छ, सुंदर असेल तर कुठलेच आजार होत नाहीत. पावसाळा आला की; अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी उपस्थिती घटू लागते व त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो. त्यावर उपाय म्हणून आजार होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केमापूर येथे आरोग्य जागर घेण्यात आला.

यावेळी आरोग्य सेविका सुजाता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दुषीत पाणी व मच्छरांमार्फत होणाऱ्या आजारांविषयी माहिती दिली. आजार पसरवणाऱ्या एडीस इजिप्ती डासांची पैदास रोखणाऱ्या गप्पी माशांबद्दल माहिती देत प्रत्यक्ष गप्पी मासे विद्यार्थ्यांना दाखवले. प्रास्ताविक दगडोबा माघाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रणिता गाडे यांनी केले. प्रभावती घुगे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण आष्टकर, अंगणवाडी ताई कल्पना पालवे, आशा कार्यकर्ती रेखा बुधवंत, शकुंतला आंधळे, एकनाथ सारोक यांनी परिश्रम घेतले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!