सेलूतील श्री संत सेना महाराज मंदिरातील प्रवचनांना प्रतिसाद

सेलूतील श्री संत सेना महाराज मंदिरातील प्रवचनांना प्रतिसाद

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा, विविध कार्यक्रमांचे आयोजन

सेलूतील श्री संत सेना महाराज मंदिरातील प्रवचनांना प्रतिसाद

सेलू : सेलू् शहरातील शाहूनगर भागातील श्री संत सेना महाराज मंदिरात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी आणि श्रावण मासानिमित्त पाच ऑगस्टपासून दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळेत श्री संत सेना मानव जागृती सकल संत गाथा प्रवचनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रवचनाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सांगता असून ३० ऑगस्ट रोजी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे.
पाच ऑगस्टला कंठाळे महाराज परभणी यांच्या प्रवचन सेवेने शुभारंभ झाला. रघुनाथ महाराज आशाताई जावडे, जाधव महाराज संभाजीनगर, भगवान महाराज बोरुळ, वैद्य महाराज, उसमानपूर यांची प्रवचन सेवा झाली. ११ ऑगस्ट वाल्मीक पंडित, १२ ऑगस्ट महानंदाताई सोनवणे १३ ऑगस्ट रत्नाकर महाराज १४ ऑगस्ट सोनवणेताई, १५ ऑगस्ट अर्जुन होलिया, १६ ऑगस्ट दत्तात्रय खंदारे १७ ऑगस्ट शेषराव महाराज यांचे प्रवचन आहे. तर १८ ऑगस्ट सुरेखा पंडित, १९ ऑगस्ट राठी ताई, २० ऑगस्ट शेषनारायण इक्कर, परतूर, २१ ऑगस्ट रुख्मिनताई धोंगडे, २२ ऑगस्ट भगवान महाराज शिंदे, वाकी, २३ ऑगस्ट घोडके महाराज परळी, २४ ऑगस्ट कैलास पाटोळे बीड, २५ ऑगस्ट बालासाहेब महाराज खटिंग, परभणी, २६ ऑगस्ट सुनिता ढगे ताई २७ ऑगस्ट तात्या महाराज कुंडीकर, २८ ऑगस्ट बजरंग महाराज धायरे टाकरवन २९ ऑगस्ट अशोक महाराज राऊत, सेलू यांची प्रवचन सेवा आहे. भाविक भक्त, श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

श्री संत सेना महाराज

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!