शिक्षक गजानन शितळे यांचे सेट परीक्षेत यश
सेलू : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळेगाव येथील प्राथमिक शिक्षक गजानन शितळे हे युजीसीद्वारे मान्यता प्राप्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजीत केलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (एमएच सेट) परीक्षेमध्ये शिक्षण शास्त्र या विषयांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.या यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.