Chartered Accountant : आकिब मोदी यांचा सेलूमध्ये सत्कार
सेलू : येथील उद्योजक एकबाल अहेमद मोदी यांचे सुपुत्र आकिब एकबाल मोदी यांनी नुकतीच चार्टर्ड अकाउंटट (सीए) परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले. याबद्दल गुलमोहर कॉलनी येथील अलफलाह मुस्लिम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मुस्लिम समाजातील सेलू शहरातील एकमेव विद्यार्थी सीए परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या वेळी अलफ्लाह एज्युकेशन वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष अभियंता अनिस कुरेशी सचिव हाजी शफिख अली खान, उपाध्यक्ष शेख महेमूद, कोषाध्यक्ष निसार पठाण, सहसचिव हारूण, रशीद खान इजिनिअर, शेख असगर, शेख शमशोद्दीन, इमामोद्दीन, जावेद घोरी, जकी सिद्दीकी, इम्रान कुरेशी, हाजी रफिक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शेख मौजम यांनी केले