नूतन प्राथमिक शाळेच्या वासंतिक शिबिरात विविध उपक्रम

सेलू : येथील सौ.सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत आयोजित वासंतिक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २० एप्रिलपासून शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात हस्तकला, चित्रकला, मातकाम, व्हिडीओ चित्रफितीद्वारे ज्ञान, मनोरंजन,  गाणी-गोष्टी, मनोरंजनात्मक खेळ, योगासन आणि विज्ञान प्रयोग, वेषभूषा, दिंडी आदी उपक्रमांचा समावेश होता. सेवानिवृत्त शिक्षक, पालक, शिक्षक, संस्था अधिकारी यांच्यातर्फे खाऊची व्यवस्था करण्यात आली होती.शिबिरात विविध क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावून मार्गदर्शन केले. बुधवारी ( २७ एप्रिल) समारोप झाला. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मकरंद दिग्रसकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रवीण जोग, तर नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, चिटणीस डॉ.व्ही.के.कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, दत्तराव पावडे, एस.पी.रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरासाठी मुख्याध्यापक एस.डी.बेंडसुरे, ए.पी.रत्नपारखी, यू.जी.पांडे, ई.डी.जाधव, एस.आर.डाफणे, एस.एस.कुबरे,पवार आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!