४२ वर्षांनी जागवल्या शालेय आठवणी

४२ वर्षांनी जागवल्या शालेय आठवणी

सुरतचे उद्योजक गणेशभाई सांगोरे यांची सेलूच्या नूतन विद्यालयाला भेट

४२ वर्षांनी जागवल्या शालेय आठवणी

सेलू : सुरत (गुजरात) येथील ईप्रॉम्प्ट एंटरप्राईजचे उद्योजक आणि सेलू येथील नूतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेशभाई कन्हैयालालजी सांगोरे यांनी तब्बल ४२ वर्षांनी नूतन विद्यालय परिसरात येऊन शालेय आठवणींना उजाळा दिला.
श्री.सांगोरे हे रविवारी, १८ ऑगस्ट रोजी सेलू शहरात आले होते. प्रारंभी शालेय परिसरातील दलित मित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्याला श्री.सांगोरे यांनी अभिवादन केले. यावेळी सतीश जोशी, बाबासाहेब हेलसकर, सुरेश हिवाळे, डॉ.शरद ठाकर आदी उपस्थित होते. यानिमित्ताने मनोजकुमार बिनायके यांच्यासह अन्य वर्गमित्रांच्या गाठीभेटी घेत १९८० ते १९८२ या काळातील शालेय आठवणींना त्यांनी उजाळा दिला. श्री सांगोरे यांनी सांगितले की; सुरतमध्ये ईप्रॉम्प्ट एंटरप्राईज या इलेक्ट्रॉनिक उद्योगाद्वारे ७० ते ८० जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उद्योगाद्वारे ऑनलाईन-युपीएस सिस्टीम्स, सर्वो स्टॅबिलायझर ॲण्ड इंडस्ट्रीयल बॅटरीजच्या उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. या उत्पादनाला चांगला प्रतिसाद आहे. शाळेचा सुंदर परिसर पाहून आनंद झाला असून शाळेच्या विकासासाठी निश्चित सहकार्य राहील असेही त्यांनी नमूद केले. यावेळी एनएमएमएस परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वतीने जेष्ठ शिक्षक बाबासाहेब हेलसकर यांनी श्री सांगोरे व श्री जोशी यांचे स्वागत केले. गुजरातमध्ये उद्योगक्षेत्रात एक यशस्वी उद्योजक म्हणून श्री सांगोरे यांनी ओळख निर्माण केली. ‘नूतन’ चा लौकिक वाढवला, याचा शाळेचा अभिमान असल्याचे श्री.हेलसकर म्हणाले. यानिमित्ताने शाळेच्या वर्गखोल्या, संपूर्ण परिसर तसेच सेलू शहराचे बदलते स्वरूप पाहूनही उद्योजक सांगोरे यांनी आनंद व्यक्त केला.

४२ वर्षांनी जागवल्या शालेय आठवणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!