प्रिन्स इंग्लिश, प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी जल्लोषात

प्रिन्स इंग्लिश, प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी जल्लोषात

प्रिन्स इंग्लिश, प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये दहीहंडी जल्लोषात

सेलू जि.परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल, प्रॉस्परस पब्लिक स्कूल, जिज्ञासा बालविहार, आणि ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (२७ ऑगस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, आणि हरिभाऊ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला, ज्यामध्ये नृत्य, गायन, मटकी सजावट, तसेच श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत रंगलेल्या मुलांनी उत्सवात रंगत आणली. दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात मुलामुलींच्या पथकांनी सहा दहीहंडी फोडत उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी डॉ. संजय रोडगे यांनी मटकी फोडण्याचा उद्देश अडचणींना सामोरे जात ध्येय प्राप्त करण्याचे प्रतीक असल्याचे सांगितले.
प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये विविध स्पर्धा आणि उपक्रमांनी बाल गोपाळांचा आनंद द्विगुणित केला. बासरी सजावट, मुकुट सजावट, दहीहंडी सजावट, सामूहिक नृत्य आणि राधाकृष्ण वेशभूषा या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिज्ञासा बालविहारमध्ये नृत्यस्पर्धेला विशेष प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये चिमुकल्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली ढाले आणि योगिता बलैया यांनी केले, तर श्याम शेळके यांनी आभार प्रदर्शन केले. शिक्षक, पालक, आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची उत्सवात मोठी उपस्थिती होती, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचा आनंददायी माहोल निर्माण झाला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!