माजी सैनिक यांच्यासह पत्नी, पाल्यांना विशेष पुरस्कार

माजी सैनिक यांच्यासह पत्नी, पाल्यांना विशेष पुरस्कार

परभणी, दि.२७ : माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, पूर,जळीत,दरोडा,अपघात इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी (10 वी, 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण) अशा माजी सैनिक, पत्नी, पाल्य त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी रु. 10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रु. 25 हजार चा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद आहे.

तरी सर्व पात्र अशा माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी आपले अर्ज व कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय परभणी येथे दि. 15 सप्टेंबर, 2024 पर्यंत भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रंमाक 02452-220340 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!