विवेकानंद विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी; राधा-कृष्ण रूप स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

विवेकानंद विद्यालयात दहीहंडी उत्साहात साजरी; राधा-कृष्ण रूप स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सेलू : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव आणि राधा-कृष्ण रूप स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

स्पर्धेचे परीक्षण मोहिनी लोणीकर आणि वृषाली देशमुख यांनी केले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि राधेचा पेहराव परिधान करून राधा-कृष्ण रूप स्पर्धेत सहभाग घेतला. चौथीच्या मुलींनी “जो है अलबेला” या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गवळणी आणि भक्तीगीते देखील सादर करण्यात आली.

उच्च प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मनोरे रचून दहीहंडी फोडत गोपाळकाल्याचा आनंद लुटला. या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शंकर शितोळे, विनोद मंडलिक, दीपाली पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!