खासदार संजय जाधव यांची बोथ गावाला भेट
सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील बोथ परिसरात अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले, घरांचे, जनावरांचे, रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले. खासदार संजय जाधव यांनी बोथ येथील गावकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची सरसकट त्वरित मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. महावितरणचे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच सेलूचे तहसीलदार सेलू यांना संवाद साधून आपदग्रस्तांना तात्काळ मदत करण्यास सांगितले. यावेळी महिला त्यांच्या समस्या मांडल्या. शाळेचे विद्यार्थ्यांच्या तसेच रुग्णांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. छत्रपती संभाजीनगर येथून एनडीआरएफ जवान पाचारण करून पुरात अडकलेल्या ग्रामस्थांची सुटका करण्यात आल्याबद्दल खासदार जाधव साहेब यांचे धन्यवाद मानले. या वेळी जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर, गंगाप्रसाद आनेराव, शैलेश तोष्णीवाल, डॉ.अरुण चौधरी आदींची उपस्थिती होती.