जेष्ठ पत्रकार नारायण पाटील यांचा गुरूवारी नागरी सत्कार
दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रमुख उपस्थिती; साई नाट्यमंदिरात कार्यक्रम
सेलू जि.परभणी : सेलू येथील अधिस्वीकृतीधारक तथा जेष्ठ पत्रकार नारायण पाटील यांच्या पासष्टी व नलिनी नारायण पाटील यांच्या एकसष्टी सोहळ्यानिमित्त गुरुवारी, पाच सप्टेंबररोजी येथील साई नाट्य मंदिरात सायंकाळी पाच वाजता भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या तीस वर्षांपेक्षा आधिक काळ नारायण पाटील हे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सन्मान म्हणून या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते तथा जेष्ठ नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार पुरुषोत्तम बेर्डे (मुंबई) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, तर स्वागताध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ लहाने हे उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी सभापती अशोक काकडे, स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय साडेगावकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सेलूकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सदस्य व पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे